जरा वेडे व्हा वेडे! व्हा थोडे वेडे!
नेहमी काय शहाणपण दाखवत जगण्यात रस आहे?! फुलवेड्या माइंचे हे बोल, जणू काय जीवनाचे सर्वात मोठे गुपित किती सहज पणे सांगून जातात!
मोजून जेवायचे, नेमकेच बोलायचे, स्मित हसायचे..नेहेमीच काय असे करायचे? किती त्या ऊनाड मनाला डांबवून ठेवायचे? खरच त्याला एक दिवस तरी झोकून द्यायला हवे, असे वाटत नाही का आपल्याला? वाटते तर! कितीदा वाटते..पण नेहमीच तो ‘पण’ अगदी मांजरी सारखा आडवा येतो…आणि मग इच्छान वर कसा पाणी फिरते…रहता राहते ते कोमेजलेलं मन आणि हळव्या इच्छा…
पारवा खोली साफ करत होते..नव्या शहरात जायचे म्हटलं तर सामानाची यादी बनवणे गरजेचे असते…त्या आधी ते समान सापडणे अत्यावश्यक! पण या रोजच्या सामानात आठवणीने आठवणींचा एक गाठोडे आपण निश्चितच बंधतो…आवडते पुस्तक, रोजची लिहिलेली डायरी, मित्रांनी दिलेला बर्थडे गिफ्ट आणि काही खास फोटोस!
ड्रॉवर उघडताना तो अवजद झल्याचे मला जाणवले….बरीच वर्ष होती त्यात! कोपर्यात एक ड्रॉयिंग बुक मिळाले. उत्सुकतेने मी ते उघडले…प्रत्येक चित्र कानात एक हळूवार गोष्ट सांगून गेलं! बरेच चेहेरे परत आठवले, जे वेळ आणि स्म्रुतिबाहेर पडले होते…त्या सर्व चित्रात जणू बालपणातल्या मालिकेतील दडलेला एक भाग मला सापडला! मग वाटले की, इंजिनियरिंग च्या अवजद वजनाने हे मन गुदमरून तर नाही ना गेलं?..पण मग क्षणार्धात 4 सुवर्ण वर्षातील मनमोहक आठवणी डोळ्यासमोर नाचू लागल्या! जीवनातील छटा नि छटा दर्शवणार्या ह्या 4 वर्षात जणू पूर्ण आयुष्यच जगून काढलं मी! कधीतरी अगदी भरकटल्यासारख त्या मनाला स्वप्नांचे रथ दौडवायला मी परवांगी दिली, तर कधी कटाक्षाने विध्युत अभियांत्रिकी वाचायला लावली!
तेव्हा खर्या अर्थाने जाणवले की आयुष्य किती स्वप्नाळू आहे…जिवंतपणे जगण्यात खरी मजा आहे…
कधी जोरात गाणी लावून नाचून पहा, नाचणं सर्वांना जमतं…नेहेमीच काय आयुष्याच्या तालावर नाचायचं! कधीतरी लहरी धून वर नाचून पहा..सर्व निराशा , विचार काही वेळासाठी तरी निश्चितच गायब होतील…कधीतरी ऑफीस ची वाट चुका, समुद्र किनारी एकटेच भटका…बरेच दिवस भेटला नाहीत अश्या मित्र/मैत्रिणीला भेटा, बस ची वाट ना पाहता रस्ता पायी तुडवा…मोबाइल फोन बंद ठेवा!, तुम्हाला ते करणे जमू शकेल असे स्वतःलाच पटवून द्या!...दिलखुलास हसा, आनंद पसरवा, पथ्याचे जेवण टाळा, गरम गरम भजी चा स्वाद घ्या!…निदान एक दिवस तरी असे वागा, आयुष्याची 2 वर्ष नक्कीच वाढतील!
जरा वेडे व्हा वेडे! व्हा थोडे वेडे!